लेंफ्टिनेट कर्नल धोनी स्वातंत्र्य दिनी ‘येथे’ फडकवणार झेंडा 

श्रीनगर – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्करासोबत काम करण्यास सुरुवात केली. लेफ्टिनेंट कर्नल धोनी सध्या दक्षिण काश्‍मीरमध्ये लष्करासोबत कार्यरत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा धोनी लेह-लडाखमध्ये तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे.

धोनीने वेस्टइंडीज दौऱ्याला न जाता दोन महिन्याचा ब्रेक घेत भारतीय लष्करातील 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये सहभागी झाला. धोनीने पॅरा रेजिमेंटसोबत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. तो बटालियनसोबत काश्‍मीर खोऱ्यात 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग आणि गार्डचे कर्तव्य बजावताना दिसून येतो आहे. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि, धोनी सैन्याचे ब्रँड अँबेसिडर आहेत. सध्या तो सैन्याला प्रेरित करत आहेत. धोनी जावांनसोबत व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळत असून कठोर प्रशिक्षणही घेत आहे. शनिवारी धोनी लेहला रवाना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.