हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत देशाने प्रगती केली आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आढळराव पाटील यांना विजयी करायचे आहे.यासाठी तीनही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे.’ असे आवाहन शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी केले.
हडपसर महंमदवाडी येथे शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे,जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ .शंतनू जगदाळे अभिजीत बोराटे,अमर घुले, विकी माने,दीपक कुलाळ,स्मिता साबळे, अभिमन्यू भानगिरे, नाना तरवडे, खन्नासिंग कल्याणी, योगेश जोशी, काका पवार, सारिका पवार,योगेश सातव, संतोष लांडगे, संजय डोंगरे, संतोष रजपूत आदिंसह शिवसेना शहर आणि मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
या बैठकीला शेकडो नागरिक महिला व ज्येष्ठ नागरिक उस्फूर्तपणे उपस्थित होते. भरत गोगावले पुढे म्हणाले की लोकसभेला महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यामुळे महायुतीचे एकेक उमेदवार विजयी करणे महत्त्वाचे आहे. शिरूर लोकसभेचे आताचे खासदार हे नट असून त्यांचं काम नाटक करणे आहे.त्यामुळे त्यांना नाटक करण्यासाठी मोकळे राहू द्या. तर जनतेची कामे करण्यासाठी शिवाजी आढळराव पाटलांना लोकसभेत पाठवा. जेणेकरून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.
हडपसर मतदार संघातून ७० हजार मताधिक्यांनी विजयी होईल; शिवाजीराव आढळराव पाटील
मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला .परंतु दुसऱ्याच दिवशी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली.ती आजही अविरतपणे सुरु आहे. कारण मला पाच लाख आठ्याहत्तर हजार लोकांनी मते देऊन जो विश्वास दाखवला तो कायम राहील यासाठी काम करत राहिलो.याउलट विजयी उमेदवाराने जनतेला वाऱ्यावर सोडले. ते मतदारसंघात किती उपलब्ध झाले ते आपण पाहिले आहे. त्यामुळे जनसामान्यांना २४/७ असा उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जगात देशाला ज्या उंचीवर नेऊन ठेवत जी गॅरंटी दिली आहे. त्याप्रमाणेच मतदार संघात पाणी,वाहतूक आणि आरोग्य यावर चांगले काम करण्याची गॅरंटी देत आहे. यापूर्वी हडपसर करांनी मला नेहमीच भरभरून मताधिक्य दिले. यावेळीही मतदारसंघातून तब्बल ७० हजारांच्या मताधिक्याने माझा विजय निश्चित आहे.असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आढळराव पाटील हे जनसामान्यांचे लोकप्रतिनिधी- नाना भानगिरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने हडपसर विधानसभा मतदार संघात जवळजवळ अडीचशे कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. हडपसर येथे प्रभू श्रीराम शिल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात त्याचे लोकार्पण होत आहे. जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करणारा, कोणत्याही वेळी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील यांची ओळख आहे.त्यांचा जनता दरबार आजही सर्वांना परिचित आहे. शिवसेना कामाला लागली असून हजारोंच्या मताधिक्य देऊन आढळराव पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिकांनी केला आहे.