मुंबई : राज्यात तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन घेतले आहे, अशात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरु झाला असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
अशात शरद पवार यांची लेक आणि राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटसह व्हिडिओ शेअर करत 80 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (@PawarSpeaks) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (@NCPspeaks) पुढील दिशा… pic.twitter.com/cqOawLAaZi
— Supriya Sule (@supriya_sule) July 4, 2023