कराड – स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येथे प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी औद्योगिक व पशूपक्षी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन समारंभ शुक्रवारी सकाळी कोयना बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कोयना दूध उत्पादक संघाचे व्हा. चेअरमन बाबुराव धोकटे, संचालक मोहनराव थोरात, शंकरराव पाटील, तालुका कृषी अधिकारी आ. एम. मुल्ला, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, उपसभापती विजयकुमार कदम, संचालक मोहनराव माने, आत्माराम जाधव, अमृत पवार, मन्सूरगणी फकीर, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, जगदीश निकम, सचिन गुणवंत, बी. डी. निंबाळकर, रॉयल स्मार्ट इम्पेक्स प्रा. लि. इव्हेंटस्चे मॅनेजर सोमनाथ शेटे उपस्थित होते.