दुबई – कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या कैद्यांना एकाचवेळी फाशी देण्यात येणार आल्याबद्दल कुवेतवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका व्हायला लागली होती. मात्र या टीकेला न जुमानता कुवेतमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
ज्या कैद्यांना आज फाशी देण्यात आली आहे, त्यांच्यावर पूर्वनियोजित हत्या आणि अन्य आरोप होते. या आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. यामध्ये कुवेतमधील 3 पुरुष. कुवेतमधीलच एक महिला, सीरियातील एक पुरुष, पाकिस्तानातील एक पुरुष आणि इथियोपियातील एका महिलेला आज देहदंडाची शिक्षा देण्यात आली. या कैद्यांना कोणत्या पद्धतीने देहदंड देण्यात आला, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही.
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस गाडीसाठी ‘या’ 25 ट्रेनच्या वेळेत बदल
कुवेतमध्ये कैद्यांना फाशी दिले जाते. मात्र तेथे गोळ्या घालून मारण्याचीही पद्धत आहे. कुवेतमध्ये यापूर्वी 2017 मध्ये एकाचवेळी 7 जणांना एकाचवेळी फाशी दिली गेली होती. यामध्ये सत्तारुढ घराण्यातील सदस्याचाही समावेश होता.