दुबई – कुवेतमधील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली आहे. या आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास झाल्यांने काही कामगारांना अस्वस्थ वाटायला लागले आहे. तर काही जणांना किरकोळ भाजले आहे, असे सरकारी मालकीच्या तेल कंपनीने म्हटले आहे.
मिना अल अहमदी असे आग लागलेल्या तेलकंपनीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे नाव आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ पर्शियन आखातात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. ही आग जरी भीषण असली तरी त्याचा परिणाम वीजेच्या पुरवठ्यावर आणि तेल निर्यातीवर झालेला नाही, असे कुवेतच्या नॅशनल पेट्रोलियम कंपनीने म्हटले आहे. आगीमुळे जखमी झालेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांवर जवळपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.
या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता दिवसाला 25 हजार बॅरल तेलाचे शुद्धिकरण करून कुवेतला पुरवठा करण्याची आहे. हा पुरवठा प्राधान्याने कुवेतच्या देशांतर्गत वापरासाठी केला जातो आहे. अलिकडेच उत्सर्जन कमी करण्यासाठी या तोलशुद्धिकरण प्रकल्पाची व्याप्ती वाढवून ही क्षमता दिवसाला 3 लाख 46 हजार बॅरल तेलाच्या शुद्धिकरणापर्यंत वाढवण्यात आली आहे. तेल शुद्धिकरण प्रकल्पाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जातो आहे. या आगीमुळे कुवेतच्या किनाऱ्याजवळील फहाहील जिल्ह्यापर्यंत मोठ्या स्पोठांचा आवाज ऐकू येत होते.