मुंबई – पश्चिम रेल्वेने मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक लक्षात घेऊन 25 गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्यांचे नवे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. ज्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, त्यामध्ये मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ट्रेनच्या वेळेत केवळ काहीं मिनिटांचा बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रक येत्या काही दिवसांत लागू होईल. रेल्वेचे कामकाज सुरळीत होण्यासाठी हे करण्यात आले आहे,असे ठाकूर म्हणाले.
ट्रेन संख्या 20901/02 मुंबई सेंट्रल- गांधीनगर केपीटल वंदे भारत एक्सप्रेस के परिचालन और ट्रेन संख्या 12009/10 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस के समय में बदलाव के कारण कई ट्रेनों के समय में संशोधन किया जाएगा। pic.twitter.com/B28XBmkkZM
— Western Railway (@WesternRly) November 16, 2022
मुंबई सेंट्रल अहमदाबाद गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस, हावडा अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस गोरखपूर हमसफर एक्स्प्रेस आणि वांद्रे टर्मिनस रामनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस या काही गाड्या आहेत ज्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
DUE TO THE RUNNING OF 20901 VANDE BHARAT & CHANGE IN TIMINGS OF 22953 W.E.F. 16.11.2022, THERE WILL BE SLIGHT CHANGES IN THE TIMINGS OF SUBURBAN SERVICES DETAILS OF WHICH ARE AS UNDER. pic.twitter.com/yT6yoD7xuW
— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) November 15, 2022
दरम्यान, स्वदेशी बनावटीच्या सेमी-हाय स्पीड मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी 30 सप्टेंबर रोजी गुजरातच्या राजधानीतून हिरवा झेंडा दाखवला होता.