निगडी – महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचे अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड यांचे कार्यक्षेत्रांतर्गत मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र निगर्मित करण्यात येत आहे. त्यासाठी तळवडे गावठाण मारुती मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तळवडे चिखली तलाठी, कोतवाल सुधीर रोकडे, महेश रोकडे, तळवडे गावचे सर्व ग्रामस्थ, माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. तळवडे तलाठी वर्ष आरमळकर यांनी कुणबी दाखल्या संदर्भात शासनाची जी नियमावली आली त्याची सर्व माहिती ग्रामस्थांना दिली.
दाखले कशा पद्धतीने काढायचे, शासनाने जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये त्यांची नावे आली आहेत त्या नावाप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार करायचे तर नंतर दाखले, सातबारा उतारे ही कागदपत्रे तयार करून आपल्या कुटुंबाची वंशावळ तयार करून ज्यांचे नाव कुणबी म्हणून शासनाच्या यादीमध्ये आले त्या नावाप्रमाणे वंशावळ जुळवून अर्ज सादर करायचा. ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त 356 नोंदी तळवडे गावच्या कुणबी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये सापडल्या आहेत.