पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी (दि २०) १० व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २२ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आजपर्यंत एकुण ४९ व्यक्तींनी एकुण ९२ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे : श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव, शिवसेना), सुहास मनोहर राणे (लोणावळा, अपक्ष), शेखर पांडुरंग चंदनशिवे (पिंपरी, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस), ॲड. राजू पाटील (वाकड, अपक्ष), ॲड. पूजा कलाटे (वाकड, अपक्ष), विजय निवृत्ती वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर तुकाराम जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), भाऊ रामचंद्र अडागळे (निगडी, महाराष्ट्र मजुर पक्ष), किशोर वसंत साळवे (गणेश नगर, अपक्ष), उत्तम संभाजी कांबळे (पिंपरी, अपक्ष) तसेच शिवाजी किसन जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) आदींनी नामनिर्देशन पत्र नेले आहेत.