भोसरी – एन. जी. म्युझिकच्या वतीने सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत संस्कार गुरुकुल स्कूल, आळंदीची वेदिका फडतरे क्राउन किताबाची मानकरी ठरली आहे.
मिस, मिसेस व लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येणारी पुणे बेस्ट ब्युटी क्वीन सीजन टू-2024, ग्रँड फॅशन शो या स्पर्धेत वेदिका फडतरे या विद्यार्थिनीने लहान गटात सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या विविध कानाकोपर्यातून अनेक सर्वोत्तम स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या सर्वांमध्ये वेदिकाच्या विशेष सादरीकरणामुळे ती या स्पर्धेत विजेती ठरली. तिचा मान्यवरांच्या हस्ते क्राऊन, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाला सिरीयल व सिने अभिनेत्री राधा सागर (आई कुठे काय करते फेम) यांनी उपस्थिती दर्शविली होती. वेदिकाच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी धोंडगे, वर्गशिक्षिका व इतर सर्व शिक्षकांनी तिचे विशेष अभिनंदन केले.