कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून 21 डिसेंबरला आरक्षण सोडत निघणार आहे.महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपली होती.मात्र कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता प्रशासक नेमण्यात आले.त्यामुळे ही निवडणूक कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते.
अखेर आज आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना आराखडा सादरीकरणचा आज कार्यक्रम घोषित करण्यात आला त्यामुळे इच्छुकांचे लक्ष आता तिकडे लागले आहे.तर काहींनी आपल्याला सोयीचे आरक्षण मिळावे यासाठी देव पाण्यात घातले आहेत.
ही आरक्षण सोडत केशवराव भोसले नाट्यगृहात 21 तारखेला सकाळी 11 वाजता होणार असून त्याचे ऑनलाइन प्रसारणही होणार आहे त्यामुळे गर्दी करू नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलंय. याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत त्यावर हरकती व सूचनांसाठी वेळ देण्यात आला आहे
महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजता सोडतीला प्रारंभ होणार आहे. महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपली आहे. कोरोनाच्या सावटामुळे महापालिका निवडणूक झालेली नाही. परिणामी 16 नोव्हेंबरपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 81 प्रभागाचा प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे. त्याबरोबरच 2005, 2010, 2015 मधील महापालिका निवडणुकीतील आरक्षणाचा अहवालही देण्यात आला आहे.