मुंबई : कतरिना कैफ तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंट, जबरदस्त डान्स स्किल आणि वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. या अभिनेत्रीने 2021 मध्ये विकी कौशलसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कतरिना आणि विकीने शेवटच्या क्षणापर्यंत आपले नाते सार्वजनिक केले नाही.
सध्या कतरिनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात तिने पुन्हा एकदा झोयाची भूमिका साकारली असून सलमान खानसोबत तिची जोडी चाहत्यांना आवडली आहे. फिल्मफेअरसोबत बोलताना कतरिनाने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले आहे, गेल्या काही वर्षांत अभिनेत्याशी तिचे नाते नक्कीच व्यावसायिकरित्या विकसित झाले आहे. कतरिनाने जेव्हा पहिल्यांदा सलमान खानसोबत काम केले तेव्हा ती नवोदित होती आणि आज ती इंडस्ट्रीत एक खास स्थान आहे. तिने सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कतरिनाच्या म्हणण्यानुसार, ती सलमान खानसोबत कोणताही सीन करताना खूपच कम्फर्टेबल आहे. तिने खुलासा केला की तिचे आणि सलमानचे एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. सलमान खानचे कौतुक करताना कतरिना म्हणाली,’त्याच्यासोबत प्रत्येक दिवस नवीन असतो. त्याच्यासोबत राहणे हा माझ्यासाठी दररोज एक नवीन अनुभव आहे. दररोज काहीतरी घडते जे कल्पनेपलीकडचे असते. कतरिना कैफ आणि सलमान खान यांनी एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत, पार्टनर, मैने प्यार क्यूं किया, युवराज आणि टायगर 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘टायगर 3’ ने आतापर्यंत 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. टायगर 3 ची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.