मुंबई – कंगना राणावत (Kangana Ranaut) तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री एअरफोर्स पायलटच्या दमदार लूकमध्ये दिसणार आहे. दरम्यान, कंगना तिच्या ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 17’ मध्ये पोहोचली जिथे अभिनेत्रीने सलमान खानच्या शोमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वर्ल्ड कप 2023 (World cup 2023) बद्दल भविष्यवाणी केली. कंगनाचा यावेळसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाचा ट्रेलर (Tejas Movie) प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता कंगना तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच कंगना ‘बिग बॉस 17’ च्या सेटच्या बाहेर दिसली होती जिथे ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपबाबत भाष्य केले.
कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अभिनेत्री यंदाच्या विश्वचषकात भारताच्या विजयाचा अंदाज वर्तवत आहे. जेव्हा पापाराझी कंगनाला विचारतात की भारत विश्वचषक जिंकेल का ? तेव्हा अभिनेत्री म्हणते, ‘भारत 2023 विश्वचषक जिंकेल ही माझी भविष्यवाणी आहे.(Kangana Ranaut world cup prediction)
View this post on Instagram
कंगनाचा ‘तेजस’ (kangana in tejas) हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात ती तेजस गिलची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तेजस’नंतर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.