बेल्हे (प्रतिनिधी):- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठार भागावर शुक्रवार (दि.१२) दुपारी ४ नंतर जोरदार मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले.
पठार भागावरील शिंदेवाडी, खडकवाडी, वरणवाडी ,देसावडे,पोखरी, शिंदेवाडी, पेमदरा, व्हरूंडी या गावात जोरदार पावसाने हजेरी लावली तर आणे,आनंदवाडी, नळवणे,गुंजाळवाडी,बेल्हे,बांगरवाडी, गुळुंचवाडी,राजुरी या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सुमारे अर्धा ते पाऊनतास सुरू असलेल्या या पावसामुळे शेतात खरीप पेरणी केलेले शेतकरी समाधानी झाले आहेत.