नाणे मावळ , (वार्ताहर) – मावळ तालुका हा भाताचे आगार असले तरी गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यात ज्वारीचे पीक घेतले जात आहे. तालुक्यात ज्वारीला वातावरण पोषक मिळत असल्याने काही शेतकरी ज्वारीचे पीक घेत आहेत.
त्यामुळे परिसरात काही ठिकाणी भाता बरोबरच आता ज्वारीचे पीक घेताना शेतकरी दिसत आहेत. ही ज्वारी काढण्यास आली असून अनेक शेतकऱयांनी ज्वारी काढणीला सुरवात केली आहे. तर, काहींनी ती काढली आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात हे पीक घेतले जात असते. त्याच बरोबर ज्वारी हे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या उन्हाचा तडका बसत आहे. तरी शेतकरी बांधव आपल्या शेतातील कामे करताना दिसत आहेत.
फाल्गुन महिन्यात ज्वारीच्या पीकाच्या काढणीला सुरवात झाली आहे. नाणे मावळ परिसरात प्रगतशील शेतकरी सुनील ढवळे यांनीही शेतात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले असून ते काढण्यात आले आहे.