‘Jawan’ box office collection Day 5 : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने (jawan movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 550 कोटींचा आकडा गाठला आहे. देशांतर्गत कलेक्शनमध्ये 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘जवान’ हा 2023 मध्ये भारतात 300 कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा बॉलीवूड चित्रपट ठरला आहे.
‘जवान’ बॉक्स ऑफिस कलेक्शन –
‘जवान’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी, चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये 74.50 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 129.06 कोटींची कमाई करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ओपनिंग डेचा साक्षीदार ठरला. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, 5 व्या दिवशी, 11 सप्टेंबर रोजी ‘जवान’ने भारतात 30 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील एकूण कलेक्शन आता 316.16 कोटी रुपये झाले आहे.
SRK चा चित्रपट ‘गदर 2’ आणि ‘पठाण’ला मागे टाकत 300 कोटी रुपये क्लबमध्ये (नेट BOC हिंदी) प्रवेश करणारा सर्वात जलद चित्रपट ठरला आहे. ‘जवान’ने 6 व्या दिवशी हा टप्पा गाठला, तर ‘पठाण’ने 7 व्या दिवशी आणि ‘गदर 2’ने 8 व्या दिवशी एवढी कमाई केली. दुसरीकडे, जागतिक स्तरावर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर आधीच 550 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे व्यापार तज्ञ रमेश बाला यांनी सांगितले.
‘जवान’ बद्दल
‘जवान’ 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसह विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट व्यावसायिक मनोरंजन करणारा आहे आणि यात शाहरूख खान अधिकारी आणि चोर अशा दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद आदी ठिकाणी झाले आहे. अनिरुद्ध रविचंदरने या चित्रपटासाठी संगीत दिले आणि बॉलिवूडमध्ये एकल संगीतकार म्हणून पदार्पण केले.