Shahrukh Khan | Praniti Shinde | Solapur। देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला आज सुरुवात झाली. त्यातच, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी काल अंतिम मुदत असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले.
सोलापूरमधील काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनीसुद्धा शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीत चक्क बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने हजेरी लावली असल्याचं दिसून येत आहे.
सध्या या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी शाहरुखच रॅलीत अवतरला की काय, असा प्रश्न अनेकांना पडला. । Shahrukh Khan | Praniti Shinde | Solapur
Congress hired duplicate Shahrukh Khan for their campaign😂 pic.twitter.com/F30XlHpkzW
— Kreately.in (@KreatelyMedia) April 19, 2024
मात्र, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नीट पहिला तर यामध्ये अभिनेता शाहरुख खान सारखा दिसणार व्यक्ती दिसून येत आहे. त्याचे हावभाव, दिसणं हे हुबेहूब किंग खानसारखेच होते. त्यामुळे सर्वजण पेचात पडले होते. मात्र प्रचार रॅलीत काँग्रेसने डुप्लीकेट म्हणजेच शाहरुखसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला आणलं होतं.
यामध्ये काळ्या टी-शर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये हा डुप्लीकेट शाहरुख पहायला मिळतोय. त्याची हेअरस्टाइल, दिसणं, हातवारे हे शाहरुखसारखेच आहेत. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी सोलापुरात प्रचंड गर्दी झाली होती.
सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होत आहे. त्यामुळे ही लढाई माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी आहे.
शाहरुख खानचा डुप्लिकेट ‘इब्राहिम कादरी’…. । Ibrahim Qadri । Shahrukh Khan duplicate
शाहरुख खानचा डुप्लिकेट ‘इब्राहिम कादरी’ सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. शाहरुख खानसारखा दिसणारा आणि वागणूक दाखवणारा इब्राहिम कादरी गुजरातच्या जुनागडचा रहिवासी आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुखसारखा दिसण्यासाठी कादरी दर महिन्याला 25 हजार रुपये खर्च करतात आणि प्रत्येक शोसाठी 35-40 हजार रुपये घेतात. कादरी हे व्यवसायाने कलाकार आहेत. जाहिरातींच्या स्केचेसशिवाय अप्रतिम चित्रे काढण्यातही ते माहीर आहेत. । Shahrukh Khan | Praniti Shinde | Solapur