Aryan Khan| बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आर्यन खान परदेशी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याआधी त्याचे नाव अनन्या पांडे, शनाया कपूर हिच्यासोबत देखील जोडले गेले होते. त्यानंतर आता आर्यन खान लारिसा बोन्सीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
आर्यन खान लारिसाच्या संपूर्ण कुटुंबियांना फॉलो करतो. आर्यनने लारिसाच्या आईला वाढदिवशी खास भेट दिली होती. लारिसा परदेशातील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या’देसी बॉयज’मध्येही ती दिसून आली आहे.
View this post on Instagram
कोण आहे लारिसा बोन्सी? Aryan Khan |
लारिसा बोन्सी एक ब्राजीलियन मॉडेल आणि डान्सर आहे. तसेच तिने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत ‘सुबह होने न दे’ या ब्लॉकबस्टर गाण्यातही लारिसा दिसून आली होती. टॉलिवूडच्या ‘नेक्स्ट एनी’ आणि ‘थिक्का’ सारख्या चित्रपटांत लारिसाने काम केलं आहे. अक्षय कुमारच्या’देसी बॉयज’मध्येही ती दिसून आली आहे. टायगर श्रॉफ आणि सूरज पंचोली यांच्या काही म्युझिक व्हिडीओ अल्बमध्येही ती दिसून आली आहे.
आर्यन खानबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सध्या ‘स्टारडम’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा तो सांभाळत आहे. आर्यन खानच्या या पहिल्या वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. याशिवाय आर्यन हा कपड्यांचा ब्रँड D’YAVOL चा मालक आहे.
हेही वाचा:
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कॅन्सर ; पोस्ट करत दिली माहिती, म्हणाले,”देश आणि पक्षासाठी…”