The Kerala Story Movie । Doordarshan – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात दूरदर्शनवर ‘केरळ स्टोरी’ हा वादग्रस्त चित्रपट दूरदर्शनवर प्रसारीत करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी सतीशन यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लिहिलेल्या पत्रात सतीसन यांनी आरोप केला आहे की, केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे सत्ताधारी भाजपला निवडणुकीत लाभ व्हावा आणि राज्यात धार्मिक आधारावर समाजात फूट पाडावी असा त्यांचा प्रयत्न आहे. । The Kerala Story Movie । Doordarshan
Requested @ECISVEEP to stop telecast of #KeralaStory as it is a malicious attempt to divide society&spread falsehood. Any attempt to depict Kerala in a negative & dishonest way should be stopped. #Doordarshan has become a SanghParivar tool spreading wrong and propogandist content pic.twitter.com/VeSTAWsdls
— V D Satheesan (@vdsatheesan) April 5, 2024
दुरदर्शनने ५ एप्रिल रोजी “केरळ स्टोरी” हा चित्रपट प्रसारित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळले आहे. तुम्हाला माहिती आहे की, केरळ स्टोरी हा अत्यंत खोट्या गोष्टींवर आधारित प्रचारात्मक चित्रपट आहे.
आणि तेथील लोकांचे बदनामिकारक चित्र रंगवण्याचा त्यात प्रयत्न केला आहे. देशाला जातीय आधारावर विभाजित करण्याचा संघ परिवाराच्या विषारी अजेंड्याचा हा भाग आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन आहे, असे सतीसन म्हणाले. । The Kerala Story Movie । Doordarshan