SRK Smoking in Ipl Match : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएलच्या या मोसमाची विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात यजमान संघाने रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. मात्र केकेआरच्या या विजयापेक्षा त्याचा मालक असलेल्या शाहरुखच्या स्मोकिंग स्टाईलची सध्या चांगलीच चर्चा आहे. | SRK Smoking in Ipl Match
या सामन्यात आंद्रे रसेलने 25 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली. यावेळी शाहरुख खान आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये होता. केकेआरच्या चाहत्यांसाठी शाहरुख खानला पाहणे हा एक आनंदाचा क्षण होता. | SRK Smoking in Ipl Match
दरम्यान, शाहरुख खान व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सिगारेट ओढताना दिसत आहे. शाहरुख खानला अशा प्रकारे स्मोकिंग करताना पाहून क्रिकेट चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.अनेकांना शाहरुखचा मॅच पाहताना स्मोकिंग करतानाच हा अंदाज चांगलाच खटकला आहे. अनेकांनी शाहरुखच्या या कृतीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. | SRK Smoking in Ipl Match
Cameraman ki timing 😂😭
What a timing Bakra 😂😂#ShahRukhKhan #IPL2024 #KKRvSRH https://t.co/JUYnHKIdwd— Our darling (@Our_darling___) March 24, 2024
रसेलने तुफानी खेळी खेळली
केकेआरने एसआरएचला २०९ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात हैदराबाद संघाला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 204 धावा करता आल्या. या सामन्यात आंद्रे रसेलने खेळलेल्या 25 चेंडूत 64 धावांच्या स्फोटक खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमावून 208 धावा केल्या. रसेलशिवाय फिल सॉल्टने 54 धावांची दमदार खेळी केली. तर रिंकू सिंगने २३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत टी नटराजनने हैदराबादकडून तीन बळी घेतले.