मुंबई – भारत व इंग्लंड मालिकेत अनेकदा दिसलेला जार्व्हो 69 रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातही दिसला. त्याने सुरक्षारक्षकांशी वाद घालत थेट मैदानात प्रवेश केला. विराट कोहली व रोहित शर्मा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तो बाहेर जायला तयार नव्हता. आता या घटनेला आयसीसीने गांभीर्याने घेतले असून स्पर्धेतील पुढील सर्व सामन्यांना उपस्थित राहण्यास त्याच्यावर बंदी घालण्यात आल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे.
विराट कोहली व रोहित शर्मा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तो बाहेर जायला तयार नव्हता. अखेर लोकेश राहुलने त्याल बाहेर जाण्यास सांगितले. जार्व्होचे खरे नाव डॅनियल जार्वीस असून तो एक सिरीयर प्रॅंकस्टर आहे. रविवारीही तो भारतीय संघाची जर्सी परिधान करुन गोंधळ घालताना दिसला. त्याने यापूर्वी भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेतही अनेकदा मैदानात उतरत गोंधळ घातला होता.
नेमकं काय घडलं होतं, जाणून घ्या….
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाच्या सामन्याच्या सुरुवातीला एक मजेदार घटना घडली. मैदानात घुसखोरी करण्यासाठी ओळखला जाणारा इंग्लिश क्रिकेट चाहता जार्वो-69 पुन्हा एकदा मैदानात उतरला. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात नुकतेच पोहोचले असतानाच त्याने ही एंट्री केली. इंग्लंडचा जार्व्हो लाईव्ह सामन्यावेळी अनेकदा सुरक्षा भेदून मैदानात प्रवेश करण्यासाठी बदनाम आहे. ‘जार्व्हो 69’च्या या कृतीमुळे सामना अनेकवेळा थांबवावा लागला आहे.
येथे जार्वो टीम इंडियाची जर्सी परिधान करताना दिसला. त्याने आपली जर्सी नंबर फक्त 69 ठेवला होता. त्याने अतिशय हुशारीने स्टेडियमच्या सुरक्षेला चकमा देत भारतीय खेळाडूंपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. फोटोंमध्ये तो केएल राहुलसोबत दिसत आहे. काही फोटोंमध्ये विराट कोहली त्याला बाहेर पाठवताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी विराट कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याला काही तरी म्हणाला. विराटच्या बोलण्यामुळे जार्व्हो भडकल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Jarvo banned by ICC from attending any more World cup matches🥲#ICCWorldCup #CWC23 #ODIWorldCup2023 #INDvsAUS pic.twitter.com/XLDnMJ2F3o
— Cricket Enthusiast (@tarunreddyoo7) October 8, 2023
जार्वोने याआधीही क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा मैदानात घुसखोरी केली आहे. 2021 साली इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत तो पहिल्यांदाच असा प्रकार करताना दिसला होता. तो भारतीय कसोटीची जर्सी घालून खेळपट्टीवर पोहोचला. या मालिकेतील चारही कसोटी सामन्यांमध्ये घुसखोरी करून जार्वो चांगलाच चर्चेत आला होता.
जार्वोने केवळ क्रिकेटच्याच नव्हे तर फुटबॉलच्या मैदानातही घुसखोरी केली आहे. गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यातही तो मैदानात उतरला होता. ‘जार्व्हो 69’हा क्रिकेटचा चाहता आहे. ‘जार्व्हो 69’ हा भारतीय क्रिकेटपटू नाही किंवा त्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही. त्याऐवजी, तो एक सिरीयल प्रँकस्टर आहे, जो इंग्लंडमधील केंट काउंटीच्या ग्रेव्हसेंड शहराचा रहिवासी आहे. ‘मात्र, 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये जार्वोच्या एंट्रीमुळे तो पुन्हा सोशल मीडियावर स्टार झाला आहे. क्रिकेट चाहते त्याच्याबद्दल सतत पोस्ट करत असतात.