Mohammed Shami Thanks PM Modi for Encouraging Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पीएम मोदी त्याला मिठी(गळाभेट) मारताना दिसत आहेत. रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबाद येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलनंतरचे टीम इंडियातील ड्रेसिंग रुममधील हे छायाचित्र आहे.
टीम इंडियानं विश्वचषक फायनलचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना 6 विकेटने गमावला. या पराभवानंतर करोडो भारतीय क्रिकेट चाहते दु:खी तर होतेच, पण टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर निराशाही दिसत होती. रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज मैदान सोडतानाही रडले. अशा स्थितीत पीएम मोदीही आपल्या जागेवरून उठले आणि थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमकडे गेले. येथे त्यांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यादरम्यान पीएम मोदी यांनी मोहम्मद शमीलाही मिठी (गळाभेट) मारली. तसेच कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे.
मोहम्मद शमीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. शमीने लिहिले की, ‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. या संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिल तसेच आमचं मनोधैर्य वाढवलं त्याबद्दल आम्ही सर्व पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु” असं शमीने म्हटलं आहे.
Unfortunately yesterday was not our day. I would like to thank all Indians for supporting our team and me throughout the tournament. Thankful to PM @narendramodi for specially coming to the dressing room and raising our spirits. We will bounce back! pic.twitter.com/Aev27mzni5
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 20, 2023
रविंद्र जडेजाचीही पोस्ट…
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूमला दिलेल्या भेटीचे फोटो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही शेअर केले आहेत. त्याने म्हटले आहे की, “पराभवामुळे आम्हा सर्वांची निराशा झाली असली तरी चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करत राहू. तसेच जडेजाने पीएम मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिल्याचं देखील सांगितले आहे.
We had a great tournament but we ended up short yesterday. We are all heartbroken but the support of our people is keeping us going. PM @narendramodi’s visit to the dressing room yesterday was special and very motivating. pic.twitter.com/q0la2X5wfU
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 20, 2023
अन्… वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं
दरम्यान, या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य होती. इंडियानं सर्व 10 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. येथे टीम इंडियाचा विजयाचा दावा मजबूत होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषक फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 240 धावा केल्या, जे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 7 षटक शिल्लक असताना पूर्ण केले. कांगारू संघाने येथे 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. यानंतर आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.