Women’s FIH Pro League 2023-24 : भारतीय महिला हॉकी संघाला बुधवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-0 असा पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. याआधी नेदरलँड आणि चीनविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस स्टीवर्ट (19वे मिनिट), टॅटम स्टीवर्ट (23वे मिनिट) आणि कॅटलिन नाॅब्स (55वे मिनिट) यांनी गोल केले. दुसरीकडे, भारताला एकही गोल करण्यात यश आले नाही. सामन्यात ग्रेस स्टीवर्टने 19व्या मिनिटाला भारतीय बचावफळी भेदत मैदानी गोल केला. यानंतर भारतीय संघाने पलटवार केला, मात्र त्यात यश मिळू शकले नाही.
A win still alludes us here in the FIH Pro League 2023/24.
Another tough loss for the team, we showed sparks of brilliance throughout the game but couldn’t convert our chances.
INDIA 🇮🇳 0 – AUSTRALIA 🇦🇺 3
Goal Scorers:
19′ STEWART Grace
23′ STEWART Tatum (PC)
55′ NOBBS… pic.twitter.com/mtFsi1zmFx— Hockey India (@TheHockeyIndia) February 7, 2024
त्याचवेळी, 23व्या मिनिटाला टॅटम स्टीवर्टने ड्रॅग फ्लिकसह पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत ऑस्ट्रेलियाची आघाडी दुप्पट केली आणि पहिल्या हाफअखेर ऑस्ट्रेलियाने 2-0अशी आघाडी कायम ठेवली होती. तिसरा क्वार्टर गोलशून्य राहिला. 55व्या मिनिटाला केटलिन नॉब्सने मैदानी गोल करत स्कोअर 3-0 करत आघाडी आणखी मजबूत केली. यानंतर अखेरच्या क्षणी नवनीत कौरला गोल करण्याची संधी मिळाली, मात्र तिला या संधीचे सोने करता आले नाही आणि यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना 3-0 असा जिंकला.
#FIHProLeague24 (Women’s) : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव…
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा विजय टोकियो 2022 ऑलिम्पिकमध्ये होता जिथे त्यांनी 1-0 असा विजय मिळवला होता. FIH प्रो लीग मधील भारतीय महिला हॉकी संघाचा पुढील सामना शुक्रवारी अमेरिकेविरुद्ध होणार आहे.