चेन्नई :– भारतीय संघाने आपल्या विश्वचषकाच्या मोहिमची (Mission World Cup) दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला (India beat Australia) पराभूत करत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. अवघ्या 2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर अनेकांनी टीम इंडियावर आपल्याला पध्दतीनं शुभेच्छाचां वर्षाव केला आहे.
यामध्ये भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील एक अनोखी कविता पोस्ट करत भारताचा विजय साजरा केला आहे. त्यांची ही कविता इतरानां देखील चांगलीच आवडली असून अनेकांनी ती लाईक केली असून शेअर देखील केली आहे.
Laal Fool, Peela Fool.
Rahul and Kohli batting beautiful.
A partnership to remember for a long time.भारत को जीत पर बधाई । #WorldCup2023 pic.twitter.com/fQJVLgSt6s
— Virender Sehwag (@virendersehwag) October 8, 2023
Laal Fool, Peela Fool. (लाल फूल, पीला फूल)
Rahul and Kohli batting beautiful. (राहुल अॅण्ड कोहली बॅटींग ब्युटीफुल)
A partnership to remember for a long time. (अ पार्टनरशिप रिमेम्बेर टू फाॅर ए लाॅन्ग टाईम)
भारत को जीत पर बधाई
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात 199 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने 201 धावा करत ऑस्ट्रेलियावर 6 गडी आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालीय. 11 ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी (India vs Afghanistan) भिडणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.