Sharvari Wagh – बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ‘शर्वरी वाघ’ (Sharvari Wagh) हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.
2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी (Sharvari Wagh) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.
शर्वरी वाघ (Sharvari Wagh) बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत असून, तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.
‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरीने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. सध्या शर्वरी वाघ सुट्टीवर गेली असून यादरम्यान तिने तिच्या बिकिनी लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शर्वरीचे (Sharvari Wagh) हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना वेड लावत आहेत. या फोटोंवर शर्वरीला खूप कमेंट्स-लाईक्स मिळत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा लाखोंचा घरात चाहता वर्ग आहे.