मुंबई : जगात आता करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत आहे. तिसरा नवा करोनाचा स्ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर डबल म्युटेंटने पुन्हा एकदा करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे करोनाची बाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, आता जपानने करोनावर मात करण्यासाठी भारतीय काड्याचा वापर करणार असल्याचे म्हटले आहे.
करोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेदिक काडा वापरण्याचा निर्णय जपानमधील इजुमियोत्स या शहराच्या महापौरांनी घेतला आहे. यासाठी पुण्यातील वैद्याचा त्यात सहभाग असणार आहे अशी माहिती मिळते आहे.
एका खासगी वाहिनीच्या संकेतस्थळावरील बातमीनुसार विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, जपानने आयुर्वेदाला महत्त्व दिले आहे. जपानने करोनावरील उपचार पद्धतीला प्राधान्य देताना पुण्यातील डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे.
करोनावर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरातील विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे जपानने करोनावर मात करण्यासाठी नैसर्गिक उपचार पद्धतीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नैसर्गिक, रसायनांशिवाय उपचारांना पसंती दिली आहे. त्यासाठीच भारतीय काड्याचा समावेश करण्यात आला आहे.