‘शिवभोजन’च्या जोडीला ‘जनसेवा’, ‘शिवराज’ थाळी!

मावळात पाच ठिकाणी “शिवभोजन’च्या 550 थाळ्या


कान्हे ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवभोजन केंद्र 


‘लॉक’ तळेगावात “जनसेवा’, तर वडगाव येथे “शिवराज’ थाळी

वडगाव मावळ – कडक निर्बधामुळे गरीब, गरजूंच्या “पोटपूजा’ करण्यात येत आहे. मावळात पाच ठिकाणी शिवभोजन थाळीची सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती आणि वडगावमध्ये हॉटेल शिवराज यांच्याकडून गरीब, गरजूंसह सर्वसामान्यांसाठी माफक दरात थाळीची व्यवस्था केली आहे.

मागील आठवड्यात बुधवारपासून (दि. 14) राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गरीब-गरजू व्यक्तींसाठी मावळ तालुक्‍यात 5 ठिकाणी गुरुवारपासून (दि. 15) 1 मेपर्यंत मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

लॉकडाऊन काळात गरीब-गरजूंना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने मावळ तालुक्‍यात हॉटेल मोरया (वडगाव) येथे 75 थाळी, सप्तश्रृंगी महिला संस्था (तळेगाव दाभाडे) येथे 125 थाळी, सहयोगी स्वंयम सहाय्य महिला बचतगटतर्फे (कामशेत) 100 थाळी, हॉटेल दुर्गा (पवनानगर) येथे 100 थाळी, स्वामी समर्थ स्नॅक्‍स सेंटर (लोणावळा) येथे 150 थाळी आदी ठिकाणी मोफत शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या मोफत शिवभोजन केंद्रावर गरीब-गरजू व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार सुनील शेळके व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले. केवळ कान्हे येथील हॉटेल हिंदवी येथील शिवभोजन केंद्र बंद असून, त्या परिसरात शासकीय ग्रामीण रुग्णालय असून, गरीब-गरजू नागरिक असल्याने हे केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

वडगाव नगरपंचायत हे मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने केवळ 75 थाळी मर्यादा असल्याने थाळीचा संख्या वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मावळ तालुक्‍यात सहा शिवभोजन केंद्र आहेत, त्यापैकी कान्हे येथील केंद्र बंद असून, उर्वरित वडगाव, तळेगाव, कामशेत, लोणावळा, पवनानगर येथे शिवभोजन केंद्र सुरू आहे. गरजू नागरिकांनी मोफत शिवभोजन केंद्रातून जेवणाची व्यवस्था केली आहे.

– रावसाहेब चाटे, निवासी नायब तहसीलदार, मावळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.