Pakistan – पाकिस्तान देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशांतता निर्माण करू शकते. अशी सूचना मिळाल्यानंतर प्रशासनाने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक किलोमीटरच्या परिघात रात्री कर्फ्यू लागू केला आहे. ही व्यवस्था ४ मे पर्यंत लागू राहणार आहे. Pakistan | Lok Sabha Election 2024
उपायुक्त डॉ. राकेश मिन्हास म्हणाले की, बीएसएफच्या ६७ बटालियनने पाकिस्तानकडून वाढत्या ड्रोन कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. यानंतर, एसएसपी कठुआ शिवदीप सिंह जामवाल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर,
बीओपी पहारपूर ते बीओपी करोल कृष्णा दरम्यान एक किलोमीटरच्या परिघात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सामान्य नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम १८८ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल.
गेल्या महिन्यात २१ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानने कठुआ जिल्ह्यातील हीरनगर सेक्टरमधील मनियारी गावात ड्रोनद्वारे आयईडीची खेप पाठवली होती. दक्ष बीएसएफ जवानांनी गोळीबार करून ड्रोन पळवून लावले. मात्र, ड्रोनने टाकलेल्या मालापर्यंत तस्कर पोहोचण्याआधीच बीएसएफच्या जवानांनी ते जप्त केल्याने मोठा कट टळला.
देशात लोकसभेचं बिगुल वाजलं… अखेर निवडणुकांच्या तारखा जाहीर । Lok Sabha Election 2024
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे.
तर 4 जूनला निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. Pakistan | Lok Sabha Election 2024