Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही चकमक रात्री शोपियान जिल्ह्यातील काटोहलन भागात झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह अन्य साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी मृत दहशतवाद्याची ओळख मेसर अहमद दार अशी केली असून तो अलीकडेच लष्कर प्रॉक्सी टीआरएफमध्ये सामील झाला होता. तो स्थानिक होता, शोपियानमधील वेश्रोचा रहिवासी होता. दरम्यान, तो चकमकीत मारला गेला. आठवडाभरापूर्वीच तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. सध्या शोध मोहीम सुरू आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ही माहिती दिली.
Kashmir Zone Police tweets, “ShopianEncounterUpdate: One (01) terrorist affiliated with proscribed terror outfit TRF neutralised. Incriminating materials including arms & ammunition recovered. Search going on. Further details shall follow.” pic.twitter.com/T5luKDahOX
— ANI (@ANI) November 8, 2023
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक शोपियानच्या काटोहलन भागात झाली. या भागात दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यावर लष्कर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड तयार केले आणि जवानांची हालचाल पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना प्रतिबंधित दहशतवादी संघटना टीआरएफशी संबंधित एक दहशतवादी मारला गेला.
याआधी गेल्या आठवड्यातच श्रीनगरच्या इदगाहमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक इन्स्पेक्टर जखमी झाला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती देताना सांगितले होते की, दहशतवाद्यांनी ईदगाहजवळ इन्स्पेक्टर मसरूर अहमद यांच्यावर गोळीबार केला. टीआरएफ-लष्करने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.