Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा लवकरच ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र यातच आता रणबीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो पापाराझींवर संतापलेला दिसून येत आहे. परंतु त्याची ही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेली नाही. नेटकऱ्यांनी यावरुन रणवीरला ट्रोल केले आहे.
रणबीरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीले, “इतका अॅटिट्यूड, एक मिनिट पोझ दिली असती तर काय झाले असते” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “तुम्ही नेहमी तुमच्या समोरच्या व्यक्तीकडे कॅमेरा घेऊन पाहत राहिल्यास कोणाचीही चिडचिड होईल,” असे म्हणत रणबीरचे समर्थनही केले. त्यामुळे रणविरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रणबीरचा अॅनिमल चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीरसह अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी ‘अॅनिमल’ सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. पण जवानच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी अॅनिमलची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.