Jammu-Kashmir – जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. कुलगाममधील समनु निहामा गावात गुरुवारपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 दहशतवादी अजूनही परिसरात लपून बसले आहेत. त्यांच्या शोधासाठी सातत्याने शोधमोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन ते पाच दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यापैकी एक विदेशी दहशतवादी आहे. उर्वरित शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
#UPDATE | Kulgam Encounter update | Three Lashkar-e-Taiba terrorists killed in the ongoing encounter. Operation continues. https://t.co/OEYYLpMTr1
— ANI (@ANI) November 17, 2023
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्याच्या आसपास असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे 30 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यादरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधीही देण्यात आली, मात्र त्यांनी रायफल आणि ग्रेनेडचा मारा केला.’