Mehbooba Mufti । जम्मू-काश्मीरची ऐतिहासिक जामा मशीद नुकतीच प्रशासनाने बंद केली होती. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीर वैज उमर फारुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांना पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘जमीन, संसाधने, धर्म – तुम्ही काश्मिरींना कशापासून वंचित ठेवणार?’ असा सवालही त्यांनी यातून विचारला आहे.
‘शब-ए-कद्रच्या संध्याकाळी हजरतबल दर्ग्याला लोकांची गर्दी
या सगळ्यात शनिवारी सायंकाळी शब-ए-कदरच्या दिवशी हजरतबल दर्गा येथे मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी त्यांनी नमाज अदा केली. श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यात सर्वाधिक संख्येने उपासकांनी शुक्रवारची नमाज अदा केली. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात हा एक प्रसिद्ध दर्गा आहे. हे राज्यातील सर्वात पवित्र मुस्लिम तीर्थक्षेत्र आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी हजरतबल दर्गा येथे शुक्रवारची नमाज अदा केली.
मशिदीत सामूहिक नमाजसाठी परवानगी नाही Mehbooba Mufti ।
जम्मू विभागातील विविध मशिदींमध्ये आणि खोऱ्यातील इतर ठिकाणी शुक्रवारच्या नमाजासाठी मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनगरच्या जुन्या शहरातील नोहट्टा भागातील ऐतिहासिक जामिया मशिदीत सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले नव्हते. जामिया मशिदीचे कामकाज सांभाळणाऱ्या अंजुमन औकाफने सांगितले की, अधिकाऱ्यांनी या मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्यास परवानगी दिली नाही. व्यवस्थापन प्रमुख मीरवाइज उमर फारूक यांना आज अधिकाऱ्यांनी नजरकैदेत ठेवले आहे, असेही त्यात म्हटले आहे.