पुणे – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरिटास, यार्डी, टेक महिंद्रा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात व्हेरिटास संघाने मर्क्स संघाचा ५ गडी राखुन पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मर्क्स संघाचा डाव १९.५ षटकांत १२२ धावांवर कोसळला. याच्या उत्तरात व्हेरिटास संघाने हे आव्हान १८.२ षटकात ५ बाद १२४ धावा करून पूर्ण केले.
NZ vs SA 1st Test : न्यूझीलंडचा दुसरा सर्वात मोठा विजय, द. आफ्रिकेचा ‘इतक्या’ धावांनी केला पराभव…
दुसऱ्या लढतीत टेक महिंद्रा संघाने सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड संघावर १ धावेने थरारक विजय मिळवला. अन्य लढतीत यार्डी संघाने एसएस अँड सी अडव्हेंट संघाचा ३ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.