पुणे – ग्रेसिया स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित विराट करंडक १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत हेमंत किणीकर क्रिकेट अकादमी संघाने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी आणि साई एमजे स्पोर्ट्स अकादमी या संघांचा पराभव करून सलग दोन विजय मिळवले.
पहिल्या सामन्यातहेमंत किणीकर संघाने स्टार स्पोर्ट्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला.स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचा डाव केवळ ६० धावांवर गडगडला. हे आव्हान हेमंत किणीकर क्रिकेट अकादमीने ५.४ षटकात सहज पूर्ण केले.
IND vs ENG Test Series : जयस्वाल, बुमराह व अश्विन विक्रमांच्या पंक्तीत….
दुसर्या सामन्यात हेमंत किणीकर संघाने साई एमजे संघाचा २६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत किणीकर क्रिकेट अकादमीने १३० धावा धावफलकावर लावल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साई एमजे स्पोर्ट्स अकादमी संघाचा डाव १०४ धावांवर मर्यादित राहीला आणि संघाने सलग दुसरा विजय नोंदविला.