बारामती, (प्रतिनिधी)- बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त कारभारी प्रिमियर लिग २०२४ मोठ्या दिमाखात क्रिकेटचे सामने पार पडले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त “कारभारी प्रीमियर लीग बारामती,२०२४ स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघ विजयी झाला.
सामन्यात १९ वर्षा खालील आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले तसेच महाराष्ट्र रणजी करंडक व महाराष्ट्र प्रिमियर लिग स्पर्धेत सहभागी झालेले अनेक प्रतिभावंत खेळाडू यांनी सहभाग घेतला. बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना या खेळाडूंचा प्रत्यक्ष खेळ पाहण्याची संधी मिळाली. स्पर्धेत चार विभागांत संघाची विभागणी करुन साखळी सामने खेळविण्यात आले.
उपांत्य फेरीचे दोन सामने झाले. यामध्ये विजयी झालेले संघ म्हणजे मेवरिक्स बाॅईज पुणे व माणिकचंद ऑक्सिरीच पुणे हे अंतिम फेरीत पोहोचले. दोन संघामध्ये अंतिम सामना खेळला. हा सामना रोमहर्षक व उत्कंठावर्धक झाला. सुपर ओव्हरपर्यंत हा सामना खेळला. अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने मेवरिक्स बाॅईज पुणे संघावर मात करुन “कारभारी प्रीमियर लीग २०२४” चषक पटकावला.
विजेता संघ माणिकचंद ऑक्सिरीच संघास दोन लाख व ट्रॉफी तर उपविजेता मेवरिक्स बाॅईज पुणे संघास एक लाख व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून हरी सावंत यांस इलेक्ट्रीकल टु व्हीलर देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत अनेक वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली.
सर्वोत्कृष्ट झेलचे पारितोषिक विजेता कुणाल फणसे हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केलेले आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुप, पुणे पुनित बालन, माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी IAS अधिकारी, दौलत देसाई CEO पुना गाडगीळ ॲन्ड सन्स लि., अमित मोडक, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, उद्योजक रवी काळे,
उद्योजक रोहित सराफ, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, उद्योजक प्रसाद शेट्टी, उद्योजक निलेश कुलकर्णी, उद्योजक राजन कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक तथा कारभारी प्रीमियर लीग, बारामतीचे अध्यक्ष प्रशांत सातव यांनी प्रास्ताविक केले.