श्रीहरीकोटा,(ओडिशा) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या इनसॅट ’ डी एस या अंतराळ संशोधन उपग्रहाचे आज शस्वीपणे प्रक्षेपण करणयात आले.
जीएसएलव्ही रॉकेटच्या आधारे झालेले हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यामुळे या रॉकेटच्या कार्यक्षमतेबद्दल आता कोणतीही शंका उरली नाही.
या रॉकेटच्या आधारे पूर्वी करण्यात आलेले प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. त्यामुळे या प्रक्षेपणाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या यशामुळे अंतराळ संस्थेला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे.
कारण जीएसएलव्ही पुढील निसार मिशनमध्ये तैनात केले जाईल, ही अंतराळ मोहिम म्हणजे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेसोबतचा एक सहयोगी प्रयत्न आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले.