Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel Palestine Conflict) यांच्यातील युद्ध काही केल्या थांबताना दिसत आहे. हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या संघर्षामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.त्यातच आता इस्रायली सैनिकांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीत (Gaza Strip) इस्रायली ध्वज (Flag of Israel) फडकवला आहे. याचा व्हिडीओ इस्रायली पत्रकार हनन्या नफ्तालीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केला आहे.
हमास आणि इस्रायल दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. बॉम्बफेक आणि हवाई हल्ल्यांसोबत जमिनीवरही हमास आणि इस्रायली सैनिक यांच्यात युद्ध होताना दिसत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे म्हटले आहे. आम्ही सध्या करो या मरोच्या परिस्थिती आहोत, असेही नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी, ‘शनिवारी संध्याकाळी आमच्या सैन्याच्या अतिरिक्त तुकड्या गाझामध्ये दाखल झाल्या. हा युद्धाचा दुसरा टप्पा आहे. याचे स्पष्ट ध्येय म्हणजे हमास सैन्याचा नाश आणि आमच्या ओलीसांची सुरक्षित सुटका. युद्ध मंत्रिमंडळ आणि सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही एकमताने ग्राउंड ऑपरेशन्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.’असे म्हटले. या पार्श्वभूमीवर इस्रायलने आता गाझा पट्टीत बेछूट हल्ला सुरु केला आहे. हमासच्या संपूर्ण नायनाट करणे, हेच इस्रायली सैन्याचे उद्दिष्ट आहे.
हमासविरुद्ध सुरू असलेले हे युद्ध दीर्घकाळ चालणार असून अत्यंत कठीण असेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना नेतान्याहू यांनी , ”असे काही क्षण येतात जेव्हा एखाद्या राष्ट्राला दोन शक्यतांचा सामना करावा लागतो, ते म्हणजे करे किंवा मरो. आता आम्ही त्याच परीक्षेतून जात आहोत आणि ते कसे संपेल यात मला शंका नाही. आम्ही हे संपवू आणि आम्हीच विजेते होऊ.”म्हटले आहे.