इस्तंबुल – इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान द्विराष्ट्र तोडग्याची अंमलबजावणी झाली तर हमास शस्त्रेखाली ठेवण्यास तयार आहे, असे हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्याने म्हटले आहे. तसे झाल्यास हमास इस्रायलबरोबर ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा तह मान्य करेल. पॅलेस्टाईनला १९६७ पूर्वीच्या सीमांसह स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला तर हमास राजकीय पक्ष म्हणून काम करण्यास तयार आहे, असेही या नेत्याने म्हटले आहे. (Hamas is ready to be put under arms if a two-state solution is implemented between Israel and Palestine)
इस्रायल आणि हमास दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धबंदीसाठी सुरू असलेली चर्चा खोळंबली असताना हमासचा नेता खलिल अल हय्या याने एका मुलाखतीमध्ये ही तयारी दाखवली आहे. इस्रायलने गाझामध्ये केलेल्या प्रचंड विद्ध्वंसाच्या पार्श्वभुमीवर हमासने शस्त्रे खाली ठेवण्याची दिलेली ग्वाही महत्वाची मानली जाते आहे. मात्र इस्रायलकडून याबाबतची पूर्वअट मान्य केली जाण्याची शक्यता धूसर आहे.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यानंतर हमासला पूर्ण नष्ट करण्याच्या इराद्यावर इस्रायल ठाम आहे. इस्रायलने मध्यपूर्व युद्धादरम्यान ताब्यत घेतलेल्या पॅलेस्टाईनच्या भूमीवर स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अस्तित्वात आणला जावा, याला इस्रायलच्या नेत्यांचा कडवा विरोध आहे.
खलिल अल-हय्या हा हमासचा वरिष्ठ राजकीय नेता असून युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटींसाठी तोच हमासचे प्रतिनिधीत्व करतो आहे. गाझा आणि वेस्ट बँकेत एकिक-त सरकार स्थापन करण्यासाठी फतेह या प्रतिस्पर्धी गटाच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायजेशनमध्ये हमास सामील होऊ इच्छित असल्याचे त्याने इस्तंबुलमधून दिलेल्या मुलाखतीत सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार गाझा आणि वेस्ट बँकेतील संपूर्ण एकिकृत सरकार आणि इस्रायलच्या १९६७ पूर्वीच्या सीमांमध्ये पॅलेस्टिनी शरणार्थ्यांनी परतणे स्वीकारायला हमास तयार आहे. जर तसे झाल्यास हमास आपली सशस्त्र शाखा विसर्जित करायला तयार असल्याचेही त्याने सांगितले.
स्वातंत्र्याती मागणी मान्य झाल्यास सश्त्र गटाची गरजच काय असेल? हमास राजकीय पक्ष बनेल आणि लढणारे सर्व जण देशाच्या सैन्यामध्ये सामील केले जातील, असेही तो म्हणाला. मात्र या द्विराष्ट्रवादाच्या तोडग्यामुळे इस्रायलबरोबर दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल का, हे अल हय्या याने स्पष्ट केले नाही.