नवी दिल्ली : बेंगलुरू एफसीने कर्णधार सुनील छेत्री याच्या दोन गोलच्या जोरावर इंडियन सुपर लीगमध्ये फुटबाॅल सामन्यात एफसी गोवावर २-१ विजय नोंदवला.
A winning start to the New Year for @bengalurufc 👏#BFCFCG #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/wP6HyddjA9
— Indian Super League (@IndSuperLeague) January 3, 2020
पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात यश आले नव्हते. पण, बेंगलुरूच्या सुनील छेत्रीने दुस-या सत्रात ५९ व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर पुढच्या दोन मिनिटात एफसी गोवा संघाच्या हुगो बोमौसने ६१ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. मात्र, सुनील छेत्रीने सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला संघाकडून विजयी गोल केला.
बेंगलुरू संघाची गोवाविरूध्द आयएसएलमध्ये सात सामन्यात हा पाचवा विजय ठरला. या विजयासह बेंगलुरूचा संघ ११ सामन्यातील १९ गुणांसह दुस-या स्थानी पोहचला आहे तर गोवा एफसी संघ २१ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे.