मुंबई – आयपीएल 2022 मध्ये आज 20 वा सामना खेळला जात आहे. दुहेरी हेडरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने आहेत. वानखेडे स्टेडियमवर राजस्थानविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update from Wankhede 🚨@klrahul11 has won the toss & @LucknowIPL have elected to bowl against @rajasthanroyals.
Follow the match 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/Y5DrP9eILK
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
या सामन्यासाठी दोन्ही संघात दोन बदल करण्यात आले आहेत. एविन लुईस आणि एंड्रयू टाय यांना लखनौ सुपर जायंट्सने वगळले आहे आणि त्यांच्या जागी मार्कस स्टॉइनिस आणि दुष्मंथा चमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर राजस्थान रॉयल्समध्ये नवदीप सैनीच्या जागी कुलदीप सेन आणि यशस्वी जैस्वालच्या जागी रसी वान डेर दुसेनचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, रासी व्हॅन डेर डुसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार-यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंदेश कृष्णा, युझवेंद्र चहल
लखनौ सुपर जायंट्स :
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान