IPL Live Cricket Score, RR vs LSG Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 193 धावा केल्या. संजू सॅमसनने कर्णधारपदाची खेळी खेळली. 52 चेंडूत 82 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याच्याशिवाय ध्रुव जुरेलने 12 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला.
Innings Break ‼️
Captain Sanju Samon and Riyan Parag lead @rajasthanroyals to 1️⃣9️⃣3️⃣/ 4️⃣
Second innings starting 🔜
Follow the match ▶️ https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/2AwyeHVheP
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली. जोस बटलर 11 धावा करून बाद झाला तर यशस्वी जैस्वाल 24 धावा करून बाद झाला. यानंतर सॅमसनने रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. राजस्थानला 142 धावांवर तिसरा धक्का बसला. परागचे अर्धशतक हुकले आणि 29 चेंडूत 43 धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. शिमरॉन हेटमायर काही विशेष करू शकला नाही आणि पाच धावा करून बाद झाला.
IPL 2024 (#CSKvRCB Match 1) | माही भाईकडून फिनिशिंग शिकलो – शिवम दुबे
दरम्यान, सॅमसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 21 वे अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केले. त्याने जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकांत राजस्थानने 50 धावा केल्या आणि एक विकेट गमावली. सॅमसनने 82 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचवेळी जुरेलने 20 धावांच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. लखनौकडून गोलंदाजीत नवीन उल हकने दोन बळी घेतले. तर मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली..