IPL Live Cricket Score, RR vs LSG Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू भाग घेणार आहेत.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने डेब्यू कॅप देवदत्त पडिक्कलला दिली, जो राजस्थानमधून ट्रेड करून लखनौला गेला होता. लखनौचे चार परदेशी खेळाडू म्हणजे क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस आणि नवीन उल हक.
🚨 Toss 🚨
Time for Match 4️⃣ of #TATAIPL 🙌@rajasthanroyals win the toss and elect to bat against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/MBxM7IvOM8#RRvLSG pic.twitter.com/fRNnp2L8hD
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
राजस्थानचा संघ तीन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. यामध्ये जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामने झाले आहेत. दोन राजस्थानने तर एक लखनौने जिंकला.
RR vs LSG Live Score: दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई. यश ठाकूर, मोहसीन खान.
Impact Player : दीपक हुडा, मयंक यादव, अमित मिश्रा, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, रायन पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
Impact Player : रोवमन पॉवेल, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, शुभम दुबे आणि कुलदीप सेन.