Indian Premier League 2024, (RCB vs PBKS) Live Cricket Score : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये, सोमवारी, होळीच्या दिवशी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ पंजाब किंग्जच्या संघाशी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रंजक होता. सामना एका मार्गाने जात नव्हता. सामन्याचे निकाल प्रत्येक क्षणी बदलत असल्याचे दिसत होते, पण शेवटी आरसीबीचा विजय झाला.
संघासाठी,अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28* धावा केल्या. लोमररने त्याला साथ दिली आणि 8 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 17* धावा केल्या. लोमररने प्रभावशाली खेळाडू (impact player) म्हणून प्रवेश केला आणि वेगळा प्रभाव टाकला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघाने 19.2 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह, आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये विजयाचे खाते उघडले कारण ते चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाले होते.
विजयासाठी 177 धावांचा पाठलाग करताना 26 च्या एकूण धावसंख्येवर आरसीबीची पहिली विकेट तिसऱ्या षटकात पडली. कर्णधार फाफ डू प्लेसिस सात चेंडूत तीन धावा करून बाद झाला. रबाडाने प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आरसीबीला दुसरा धक्का तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनच्या रूपाने बसला, जो केवळ तीन धावा करू शकला. पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रबाडाने संघाची धावसंख्या 43 असताना ग्रीनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
त्यानंतर 86 धावांवर आरसीबीला तिसरा धक्का बसला. 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने रजत पाटीदारला क्लीनबोल्ड केले. तो 18 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर लगेचच 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आरसीबीला 103 धावसंख्येवर मोठा व चौथा धक्का बसला. हरप्रीत ब्रारने ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड केले. मॅक्सवेलला पाच चेंडूत केवळ तीन धावा करता आल्या.
विराट कोहलीने झळकावले अर्धशतक
दरम्यान, विराट कोहलीने या सामन्यात 31 चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या धडाकेबाज फलंदाजाने आपल्या T20 कारकिर्दीतील 100 वे अर्धशतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीच्या रूपाने आरसीबीला पाचवा मोठा धक्का बसला. 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आरसीबीची धावसंख्या 130 असताना हर्षल पटेलने त्याला हरप्रीत ब्रारकरवी झेलबाद केले. या शानदार खेळीत त्याने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. विराट बाद झाला तेव्हा तेव्हा बेंगळुरूला विजयासाठी 24 चेंडूत 47 धावा करायच्या होत्या. मात्र त्यानंतर लगेचच आरसीबीला 16.2 षटकात 130 धावसंख्येवरच सहावा धक्का अनुज रावतच्या रूपाने बसला जो केवळ 11 धावा करू शकला. त्याला सॅम कुरनने एलबीडब्ल्यू आऊट केले.
त्यानंतर आरसीबीने महिपाल लोमरोरला प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीसाठी पाठवले आहे. त्याने येताच चौकार मारला. त्यानंतर दिनेश कार्तिकनेही चौकार मारला. त्यानंतर आरसीबीला 18 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या महिपाल लोमरोरने पुन्हा एकदा सामन्याचे चित्र फिरवले. 17व्या षटकात त्याने अर्शदीप सिंगवर एक षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात एकूण 13 धावा आल्या. त्यानंतर अखेरच्या दोन षटकात आरसीबीला 12 चेंडूत 24 धावांची आवश्यकता होती.
येथून महिलापाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी गमावलेला सामना संघाला जिंकून दिला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 48* (18 चेंडू) धावा जोडल्या आणि संघाला विजयापर्यंत नेले.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावताना 176 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
Innings Break!
20 runs from the final over powers @PunjabKingsIPL to 176/6 🔥
Will it be enough or @RCBTweets will chase this down?
Scorecard ▶️ https://t.co/cmauIj3e0o#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/QdlgTDD2vk
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2024
यादरम्यान, पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने 37 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 45 धावा केल्या. सॅम कुरनने 17 चेंडूत तीन चौकारासह 23 आणि जितेश शर्माने 20 चेंडूत 1 चौकार अन् 2 षटकारासह 27 रन्सची इनिंग खेळली. बेअरस्टो सहा चेंडूंत आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर लिव्हिंगस्टोन 13 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.
अखेरीस सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शशांक सिंगने एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 8 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. त्याचवेळी हरप्रीत ब्रारही दोन धावा करून नाबाद राहिला. शेवटचे 20 वे षटक अल्झारी जोसेफने टाकले. या षटकात एकूण 20 धावा आल्या. यात शशांक सिंगने दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
आरसीबीतर्फे गोलंदाजीच ग्लेन मॅक्सवेलनं 3 षटकात 29 धावा देताना 2 गडी तर मोहम्मद सिराजने 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त अल्ज़ारी जोसेफ आणि यश दयाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.