IPL 2024 ( KKR Harshit Rana ) : आयपीएलमधील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यावर 1 सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय त्याला मॅच फीच्या 100 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. चालू हंगामात हर्षितने आचारसंहितेचे पालन न करण्याची ही दुसरी वेळ आहे. याच कारणामुळे त्याला शिक्षा झाली आहे. यासह हर्षित राणा हा IPL 2024 मध्ये नियमांचे पालन न केल्यामुळे बंदीचा सामना करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
हर्षित राणा वर बंदी का घालण्यात आली?
गेल्या सोमवारी केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. दिल्लीने प्रथम फलंदाजी केली होती, मात्र यादरम्यान हर्षित राणाने अभिषेक पोरेलला क्लीन बोल्ड केले. वास्तविक, दिल्लीचा फलंदाज अभिषेक पोरेलची विकेट घेतल्यानंतर हर्षित राणाने वेगळ्याच प्रकारे सेलिब्रेशन केले होते, ज्यामध्ये त्याने फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये जाण्यासाठी बोटांनी इशारा केला. त्याआधी तो फलंदाजाला फ्लाइंग किस देणार होता, पण त्याला आधी मिळालेली शिक्षा आठवली म्हणून तो थांबला.
Not defending this but if he is getting banned for doing this send off then Virat should be missing entire IPL, almost every dismissal he showsthe send off with expletives, why no action on that? Harsh decision #KKR #HarshitRana pic.twitter.com/HIgt4YeugD
— $hyju (@linktoshyju) April 30, 2024
पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचे हे सेलिब्रेशन आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग मानले आणि त्याची मॅच फी कापली आणि एक सामना खेळण्यास बंदी घातली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 7 गडी राखून विजय मिळवला. हर्षित राणाने 2 बळी घेतले.
Not defending this but if he is getting banned for doing this send off then Virat should be missing entire IPL, almost every dismissal he showsthe send off with expletives, why no action on that? Harsh decision #KKR #HarshitRana pic.twitter.com/HIgt4YeugD
— $hyju (@linktoshyju) April 30, 2024
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात हर्षितने आपल्यावरील आरोप मान्य केल्याचे म्हटले आहे. हर्षित राणाला दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. हंगामाच्या सुरुवातीला केकेआर आणि एसआरएच यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये त्याने विकेट घेतल्यानंतर मयंक अग्रवालला फ्लाइंग किस दिला. या वर्तनासाठी त्याला त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हर्षित राणाने केली अप्रतिम गोलंदाजी…
केकेआर विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. हर्षितने डीसीला कमी धावसंख्येवर रोखण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. आधी त्याने अभिषेक पोरेलची विकेट्स काढली आणि नंतर रसिक सलामची विकेटही घेतली. त्याने 4 षटकात केवळ 28 धावा देत 2 बळी घेतले होते. कोलकाता नाईट रायडर्सने 21 चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा 7 गडी राखून पराभव केला. केकेआर सध्या 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.