IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये, सोमवारी, होळीच्या दिवशी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ पंजाब किंग्जच्या संघाशी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या आणि आरसीबी समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक पूर्ण करून एक मोठा विक्रम केला. T20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक पूर्ण करून एक मोठा विक्रम केला. T20 मध्ये 100 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.
First home game of the season ✅
First fifty of the season ✅51st fifty in IPL#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvPBKS @imVkohli pic.twitter.com/FqHevUNJUt
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2024
विराट कोहलीने या सामन्यात 31 चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या धडाकेबाज फलंदाजाने आपल्या T20 कारकिर्दीतील 100 वे अर्धशतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
दरम्यान, आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता, तर पंजाबने लीगच्या 17व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली होती.