BCCI announces the full schedule of IPL 2024 : देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आयपीएल 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही. सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल थांबणार नाही किंवा परदेशातही होणार नाही. आयपीएल 2024 चे सर्व सामने भारतातच खेळवले जातील. मात्र, आतापर्यंत केवळ 7 एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
आयपीएल 2024 चा हंगाम सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले नव्हते, परंतु आता प्रतीक्षा संपली आहे कारण, बोर्डाने पुढील वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 व्या आवृत्तीचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होईल तर दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी त्याच शहरात खेळवला जाईल. त्याचवेळी, पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
बीसीसीआयने पहिल्या टप्प्यासाठी 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्यातील पहिला सामना 22 मार्च रोजी झाला होता. IPL 2024 च्या पहिल्या टप्प्यातील अंतिम सामना 7 एप्रिल रोजी होणार आहे.
The wait is finally over! 😍
Here’s the complete TATA #IPL2024 schedule! Mark your calendars 📅 and don’t miss out on the non-stop cricket excitement 🔥
Tune-in to #IPLOnStar, LIVE, Only on Star Sports pic.twitter.com/9XopOFs6ir
— Star Sports (@StarSportsIndia) March 25, 2024
दरम्यान, बोर्डाने पुढील वेळापत्रक जाहीर केले आहे.
आयपीएल 2024 मध्ये सहभागी झालेल्या 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे तर ब गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील सर्व संघांमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-mahasangram-of-ipl-from-today-10-teams-66-days-and-a-total-of-74-matches/
दरम्यान, 16 मार्च (शनिवार) रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.