IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : सोमवारी आरसीबी आणि पंजाब यांच्यात सामना झाला. मात्र या सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. पण संघाच्या फलंदाजीदरम्यान असे काही घडले, ज्यामुळे पंजाब किंग्जने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. खरे तर या कथेचे मुख्य पात्र शशांक सिंग आहे.
मिनी ऑक्शन दरम्यान याच शशांक सिंगला घेऊन बरेच नाट्य घडले होते. प्रथम पंजाब संघाने शशांक सिंगला विकत घेतले. त्यानंतर अचानक संघमालकांनी बोली परत करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. मात्र, असे काहीही होऊ शकले नाही आणि शशांक सिंग पंजाब संघाचा भाग बनला.
शशांकने आरसीबीविरुद्ध काय केले..?
सोमवारी आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात याच शशांकने संघाला लढाऊ (माफक) धावसंख्येपर्यंत नेले. शशांक फलंदाजीला आला तेव्हा संघाची अवस्था बिकट होती. जितेश शर्मा बाद झाल्यानंतर पंजाबचा संघ खरोखरच अडचणीत आला होता. पण शशांक सिंगने शानदार फलंदाजी करत अवघ्या 8 चेंडूत 21 धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान, शशांकने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याचवेळी त्याचा स्ट्राइक रेट 262.50 होता. शशांकच्या या खेळीमुळे पंजाबची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत पोहोचली.
Shashank was in his element last night! 💥#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #RCBvPBKS pic.twitter.com/wLmDDOrOOX
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 26, 2024
मिनी लिलावात काय झाले…?
शशांक सिंग हा छत्तीसगडचा तडाखेबाज फलंदाज आहे. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. तो गोलंदाजीतही सक्षम आहे. मिनी लिलावादरम्यान शशांक सिंगचे नाव समोर आले तेव्हा इतर कोणत्याही संघाने रस घेतला नाही. यानंतर पंजाब संघाने त्याला विकत घेतले. अचानक पंजाब संघाला वाटले की, आपण चुकीचा खेळाडू विकत घेतला आहे.
वास्तविक, शशांक सिंग नावाचा आणखी एक खेळाडू आहे, जो बंगालकडून खेळतो. नंतर संभ्रम दूर झाला आणि पंजाब संघाने X (ट्विटर) वर पोस्ट करून शशांक सिंगच्या खरेदीवर समाधानी असल्याचे स्पष्ट केले.