IPL 2024, Live Cricket Score, MI vs CSK : आयपीएल 2024 चा 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर 7.30 वाजता सुरू होणार आहे. चेन्नईने या मोसमात 5 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. तर मुंबईने 5 सामने खेळले असून 2 जिंकले आहेत. आता या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. हा सामना रंजक ठरू शकतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यात कडवी स्पर्धा होऊ शकते.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. या सामन्यात मुंबई इंडियन्स कोणताही बदल न करता खेळताना दिसेल तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये महिष थीक्षणाच्या जागी मथिशा पाथिरानाचा समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss News 🚨@mipaltan have elected to bowl against @ChennaiIPL at Wankhede Stadium.
Follow the Match ▶️ https://t.co/2wfiVhdNSY#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/Yk7Yuy00do
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
MI vs CSK : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे…
चेन्नई सुपर किंग्स : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट सब : मथिशा पाथिराना, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, मोईन अली, शेख रशीद.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट सब : सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई.
दोन्ही संघांमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत एकूण 36 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 20 तर चेन्नईने 16 सामने खेळले आहेत. वानखेडेवर दोन्ही संघ 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने सात आणि चेन्नईने पाच विजय मिळवले आहेत. मात्र, दोन्ही संघांमधील शेवटच्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईने दोन्ही सामने जिंकले आहेत. सीएसकेने पाठलाग करताना हे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज चेन्नईचा संघ मुंबईविरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.