IPL 2024, Live Cricket Score, MI vs CSK : आयपीएल 2024 चा 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर 7.30 वाजता सुरू होणार आहे. चेन्नईने या मोसमात 5 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. तर मुंबईने 5 सामने खेळले असून 2 जिंकले आहेत. आता या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. हा सामना रंजक ठरू शकतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यात कडवी स्पर्धा होऊ शकते.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss News 🚨@mipaltan have elected to bowl against @ChennaiIPL at Wankhede Stadium.
Follow the Match ▶️ https://t.co/2wfiVhdNSY#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/Yk7Yuy00do
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
दोन्ही संघांमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत एकूण 36 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 20 तर चेन्नईने 16 सामने खेळले आहेत. वानखेडेवर दोन्ही संघ 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने सात आणि चेन्नईने पाच विजय मिळवले आहेत.
मात्र, दोन्ही संघांमधील शेवटच्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईने दोन्ही सामने जिंकले आहेत. सीएसकेने पाठलाग करताना हे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज चेन्नईचा संघ मुंबईविरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.