Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेसने महाराष्ट्रासाठी स्टार कॅम्पेनरची यादी जाहीर केली असून या यादीत एकूण चाळीस जणांचा समावेश आहे. त्यात पुण्याचे अनंतराव गाडगीळ, निर्भय बनो चळवळीचे विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, पत्रकार निरंजन टकले यांचाही समावेश करण्यात आला आहे. । Lok Sabha Election 2024। Congress
या यादीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडवेट्टीवार या प्रमुख नेत्यांची नावे आहेतच. यासोबत राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपैकी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जून खर्गे या नेत्यांचाही समावेश आहे.
अन्य नावांमध्ये वर्षा गायकवाड, सतेज पाटील, चंद्रकांत हांडोरे, यशोमती ठाकूर, कुणाल पाटील, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजीत कदम, कुमार केतकर, अतुल लोंढे, रामहरी रूपनवर इत्यादींचा समावेश आहे. । Lok Sabha Election 2024। Congress